Saturday, November 8, 2025

दिवाळी अंक स्पर्धा -✒️🏵️🏵️✒️🏵️🏵️✒️🏵️🏵️✒️🏵️🏵️✒️वाचक चळवळ व जतन



*दिवाळी अंक स्पर्धा - वाचक चळवळ व जतन*

प्रति,

संपादक/ प्रकाशक,

दिवाळी अंक २०२५,

नमस्कार !

      मित्रहो दिवाळी अंक ही मराठी साहित्यातील एक आगळी वेगळी चळवळ आहे. दिवाळीच्या पवित्र आणि आनंददायी पर्वात दिवाळी अंकाची निर्मिती करून मराठी भाषेतील विविध साहित्य दिवाळीच्या फराळाबरोबरचा एक अविभाज्य  भाग म्हणून गेली शंभराहून अधिक वर्ष मराठी घराघरात पोहोचवत आलो आहोत.

        जगभरात मोठ्या संख्येने व्यवहारात असलेल्या काही मोजक्या भाषां आहेत त्यात मराठी वरच्या क्रमांकावर आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्यावर्षी भारत सरकारने तिला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा गौरवच केला आहे.

         मात्र शाळा कॉलेजात मराठीपेक्षा इंग्रजी लाच जास्त प्राधान्य दिले जात आहे त्यामुळे सामान्य माणसाला मराठीतून व्यवहार करणे कमीपणाचे वाटू लागले आहे.भाषेचे हे आक्रमण मराठीवर काही परिणाम करु शकणार नाही असा वातानुकूलित कार्यालयात बसून दिलेला आत्मविश्वास आंधळेपणाने स्विकारुन चालणार नाही.आज गाव खेड्यात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मराठी भाषेच्या दयनीय अवस्थेने चिंतेत टाकले आहे.गाव खेड्यात दूरदूर पर्यंत वर्तमानपत्र कसे असते हे ठाऊक नाही तिथे नियतकालिके कशास म्हणतात हे कसे ठाऊक असेल ? अवांतर वाचनासाठी वाचनालये नाहीत कुठे पुस्तकाचे दुकान नाही अशा ठिकाणी आपला दिवाळी अंक कसा पोहोचणार आहे. म्हणूनच मोडीदर्पण दिवाळी अंक २०२५ च्या अनेक प्रती आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व देणगीदारांच्या सहकार्याने नाममात्र किंमतीत अनेक शाळांतून पोहोचवून वाचन चळवळीला हातभार लावण्याचा यशस्वी प्रयोग केला.

         महाराष्ट्रात अनेक दिवाळी अंक प्रकाशित होतात मात्र ते शहरांपुरते मर्यादित असतात.त्यामुळे त्यांचा आपणही मर्यादित असतो. हे दिवाळी अंक गाव खेड्यांपर्यंत पोहोचवून वाचक वाढवता येणे शक्य आहे अशी आम्हांस खात्री वाटते.

           राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई ही संस्था पंचाहत्तरी कडे प्रवास करणारी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणारी जुनी संस्था आहे. या संस्थेमार्फत गेली अकरा वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन गाव खेड्यात केलं जातं. नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं म्हणून केलेला हा प्रयत्न यशस्वी ठरत आहे. या साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शनाचे स्टॉल असतात. तसेच एक प्रदर्शन दिवाळी अंकांचे ठेवले तर वाचकांना महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांची नावे कळतील तसेच आपण कोणता दिवाळी अंक मागवावा,वाचावा हे ठरवता येईल. हे करत असताना आलेल्या दिवाळी अंकाच्या परीक्षणातून पहिले तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देता येतील.

(प्रथम क्रमांक २५००रु.प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक २०००रु.प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह,प्रथम क्रमांक २५००रु.प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक १५००रु.प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह, ३ उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह)

 प्रदर्शन संपल्यानंतर सदरचे सर्व अंक जवळच्या वाचनालयात सुरक्षितपणे ठेवता येते व वाचकाला ते वर्षभर वाचता येतील असे आमचे नियोजन आहे.

           गाव खेड्यात दिवाळी अंकांची वाचक चळवळ उभारणीसाठी,आपला दिवाळी अंक सुरक्षीत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती  २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत  *' ज्ञानगंगा वाचनालय,कोंडगे,*

मु.पो.कोंडगे,ता.लांजा,जि.रत्नागिरी पिन - ४१५६४३ 

संपर्क - गौतम जाधव ( ग्रंथपाल) 94053 26810 या पत्त्यावरती पाठवून द्याव्यात अशी विनंती करीत आहोत.

आपला विश्वासू

*प्रमोद पवार*

सरचिटणीस

राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

9821474030


विशेष सूचना :-

       हे वृत्त आपल्या माहितीतल्या दिवाळी अंक संपादक वा प्रकाशकांपर्यत पोहोचवा.तसेच आमच्या या उपक्रमाला आपल्या पद्धतीने विविध माध्यमांवर पाठवून अभिजात मराठीच्या प्रसार कार्यात सहकार्य करावे 


No comments:

Post a Comment