कोकणात जन्मलेली कोकणात शिकली सवरलेली मुलं कोकणच्या मातीला दूर सारून मुंबईमध्ये भविष्य शोधण्याचा प्रयत्न करत असतात. कोकणात उद्योगधंद्यांची कमतरता आहेच, उच्च शिक्षण आणि तदनुषंगाने विविध अभ्यासक्रमातून पारंगत होण्यासाठीची शैक्षणिक सुविधाही इथे उपलब्ध नाही हे तर खरेच आहे मात्र कोकणात राहून रोजगार मिळतच नाही किंवा जीवन जगताच येणार नाही या विधानाला डोळे झाकून पुष्टी देणे योग्य होणार नाही. कोकणची नैसर्गिक संपत्ती आणि कोकणच्या मातीचा गुणधर्म इतका गुणकारी आहे की इथे घाम गाळणाऱ्याला आणि मर्यादित सुख सुविधांवरती समाधान माणनाणाऱ्याला इथे बरेच काही करता येण्यासारखे आहे हे दाखवणारे अनेक तरुण या मातीत आज सोन्यासारखे चमकताना पाहिले की अभिमानाने छाती फुगून येते. त्या तरुणांपैकी आरगावचे अमर खामकर हे एक आहेत. त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य सांगावयास हवे ते म्हणजे त्यांचा जन्म आणि बालपण - शिक्षण ही मुंबईतलेच असताना केवळ उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे मिळालेल्या आनंदामुळे अमर खामकर यांना या मातीत आपले भविष्य आहे याचा शोध लागला आणि त्याचाच पाठपुरावा ते आज करत आहेत जाणून घेऊया त्यांच्याबद्दलची माहिती कोकण मीडियाने जी प्रसिद्ध केली आहे.
अभिप्राय -
१) प्रिय अमर खामकर,
अभिनंदन मित्रा!
आपल्या career कडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी जितके धाडस लागते,त्याहीपेक्षा कितयेकपट धाडस ते execute करण्यासाठी लागते.कारण या व्यवहारी जगात अपयशी ठरल्यास आत्मविश्वास हा आगाऊपणा ठरतो, आणि यश मात्र त्यास 'धडाडी' चा मुलामा देते.......या जीवनातील कटू सत्याला थेट भिडून प्रगतशील शेतकरी ते सदहृदयी समाजिक कार्यकर्ता म्हणून आपली वेगळी प्रतिमा तयार करणारे अमर साहेब हे आमच्या पिढीचे idol आहात.
शेती - बागायतींमध्ये, समाजिक सेवेमध्ये सर्जनशील काम करताना विविध समाजिक उपक्रमात अग्रेसर राहून समाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आपल्या आयुष्याचा कृतार्थ पौर्णिमेकडे जो प्रवास सुरु आहे, त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!!
स्वातीच्या थेंबात 'मोती' तयार करण्याची क्षमता असते. हे वास्तव आहे. त्याचप्रमाणे मा.सुभाष लाड सरांच्या शुभदायक ऊर्जेने भारलेल्या व्यक्तिमत्वात ते 'मोती' संवेदनांच्या शिंपल्यानमधून नेमके वेचून, समाजासमोर आणण्याचं अजब रसायन आहे.........याचं मला नेहमीच कौतुक वाटत. अमर साहेबांवरचा गौरव लेख छान शब्दबद्ध केलाय.
किशोर आयरे , रिंगणे
९८३३९११७७१
२)
☝️👌🏻
छान कौतुक करणारा लेख...
अशीही काही माणसे असतात...
त्यावरच हा जगाचा डोलारा उभा आहे..
लेख एकदम प्रबोधन करणारा आहे..
विकास डोईफोडे
देऊळगाव राजा,
बुलढाणा
३)
साप्ताहिक कोकण मीडिया मध्ये आपला लेख वाचला सर.
खूपच सुंदर मांडणी केलीत. आपले सर्वच लेख वाचनीय असतात. कारण, ते वास्तवातील वेगळेपण प्रतिबिंबित करणारे आणि पुढच्या पिढीला एक योग्य दिशा देणारे असतात.
निकेत पावसकर
कणकवली