राजापूर व लांजा तालुक्यातील गाव खेड्यांच्या विकासाकरता सन १९५३ मध्ये मुंबईमध्ये चाकरमान्यांनी एकत्रित येऊन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाची स्थापना केली. आपल्या समस्या सरकारी दरबारी मांडण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गावात अधिवेशने भरवायला सुरुवात केली. १९५६ साली आरगाव येथे झालेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्याची चळवळ उभारली त्याचबरोबर कोकण रेल्वे सुरू करण्याबाबतचा ठराव मांडला तसेच राजापूर व कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाट फोडून तिथे रस्ता करावा या दृष्टीने चर्चा करून कसा ठराव केला पुढील काळात त्याचा पाठपुरावा केला इसवी सन २००२ मध्ये सरकारकडून हा रस्ता पूर्ण करण्यात आला. त्याच घाट रस्त्यावर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या कडून व श्री.मनोहर हरि खापणे कला वाणिज्य महाविद्यालयाचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.२७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा.वृक्षारोपण करून तो अधिक सजवण्याचे काम होत आहे.
या कार्यक्रमाकरिता आंतरराष्ट्रीय चित्रकार विजयराज बोधनकर,इन्फिगोचे सर्वेसर्वा श्रीधर ठाकूर देसाई, संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, तळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच गायत्री साळवी, सामाजिक कार्यकर्ते किशोर नारकर, श्री मनोहर हरी खापणे कला- वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. विकास पाटील, इतिहास अभ्यासक सुनील कदम, संघाचे पदाधिकारी गणेश चव्हाण व रमेश काटकर ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत खामकर ह.भ. प. बाळकृष्ण बुवा चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, येरडव गावचे दीपक आमकर व जयेश दळवी हे सहभागी होणार आहेत.
वृक्षलागवडीचे काम वृक्ष मित्र अमर खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून वनभोजनाची पूर्वतयारी ह.भ.प.सुरेश चौगुले व राजू पत्की यांच्या सहकार्याने होईल.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वृक्षारोपण करता करता येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ या. आपणही या आनंदात सहभागी व्हावे ही विनंती.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
वा.. खुपच छान.. 🌱👏👏
ReplyDelete