कोकणातील प्रत्येक गावाचे एक आराध्य दैवत असतं. त्या दैवताला जेव्हा स्थान दिलेले असते ग्रामदैवत उद्या गावाला पूजनीय असते. गावाची रखवाली करणे तसेच गावातल्या आबालवृद्धांच्या आरोग्याची त्यांच्या समृद्धीची सुखाची शांतीची काळजी घेण्याचे काम ग्रामदैवत करत असते अशी कोकणी माणसाची ठाम श्रद्धा आहे त्यामुळे देऊळ अधिक आकर्षक बनवणे या देवांचे सण उत्सव अधिक रंगतदारपणे साजरे करून देवाच्या प्रति आदर व्यक्त करण्यास कोकणी माणूस फार उत्सुक असतो. रिंगणे गावाचे श्री धनी केदारलिंग हे आराध्य दैवत असून त्याचे देऊळ प्राचीन काळापासून आहे. यापूर्वी लाकूड कामातून व मातीच्या कौलाने सजवलेले देऊळ होते. त्या मंदिराच्या खाबांपैकी एक खांब हा निगडी चा होता असे जुने लोक सांगायचे. १९९९ साली त्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला त्यावेळेला हे खांब जिर्ण झाल्याने काढून टाकण्यात आले.
यावर्षी पुन्हा २५ वर्षांनी
जिर्णोद्धार करण्यात आला. दिनांक १२ मे १४ मे २०२५ या कालावधीमध्ये नवीन मंदिराच्या उद्घाटनाचा समारंभ असून त्या निमित्ताने रिंगणे गावचे सुपुत्र सुभाष केशव हांदे यांनी गावातील देवळे व त्यांचे उत्सव यांची माहिती देणारा लेख.व सुभाष लाड यांनी श्री धनी केदारलिंग या ग्रामदेवताच्या वर्षभरातील उत्सव परंपरेबाबत घेतलेला आढावा कोकण मिडियाने प्रसिद्ध केलेले लेख.
No comments:
Post a Comment