नमस्कार ,
आपला मोडी दर्पण दिवाळी अंक वाचकांच्या भेटीसाठी सज्ज आहे मात्र आपल्या उपस्थितीतच तो वाचकांच्या भेटीसाठी मार्गक्रमण करील. तेवढ्यासाठीच तर प्रकाशन समारंभाचे आयोजन.
या प्रकाशन समारंभाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत करण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्यास मिळणार आहे.
कथालेखन स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ असल्याने त्यांनी उपस्थित राहायचे आहेच त्याचबरोबर बरोबर सहभागी स्पर्धकांनीही हा आनंद घ्यायचा आहे.
हे वर्ष राज्यकर्त्या साध्वी अहिल्याबाई होळकर यांचे त्रिशताब्दी जयंतीचे वर्ष असल्याने त्यांच्या प्रति आदरांजली वाहण्याकरिता मा. अभयराजे जगताप यांचे छोटे खाणी व्याख्यान आयोजित केलेले आहे.
मोडीच्या प्रसार प्रचाराचे कार्य करणारे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी झपाटलेले लोक आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मोडी दर्पण कडून मोडी लिपी मित्र मंडळाकडून मोडीरत्न पुरस्कार दिला जातो यावर्षीचा मान कोल्हापूर येथील मूळ संगणकात मोडी फॉन्ट बसवून तांत्रिक युगातही मोडीला स्थान देणारे नवीनकुमार माळी यांच्याकडे जात आहे.
अशा या भरगच्च कार्यक्रमात आपण आपल्या मित्रमंडळी सह उपस्थित राहावे यासाठी आम्ही आपणास आवाहन करीत आहोत.
सुभाष लाड
संपादक
मोडी दर्पण
No comments:
Post a Comment