आम्ही आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे असे कितीही म्हटले तरी बऱ्याच क्षेत्रात महिलांच्या कर्तुत्वाला संधी दिली जात नाही उदाहरणादाखल आपल्याकडे गावाच्या, समाजाच्या, ज्ञाती बांधवांच्या अनेक संस्था आहेत या संस्था पुरुष प्रधानच आहेत. काही ठिकाणी स्त्रियांना संधी द्यायची म्हणून एका दुसरे पद देऊन स्त्रियानाही संधी देतो हे सांगायचा मार्ग मोकळा केला आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया आल्या तर आज अनेक संस्था तरुण कार्यकर्ते नसल्याने बंद पडण्याचे अरिष्ट आले आहे ते तरी टळू शकेल.
नोकरीच्या क्षेत्रात आज तरी स्त्रियांची संख्या लक्षणीय ठरली आहे. शिक्षण क्षेत्रात तर महिलांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीतरी मोठी आहे.असं कोणतंही क्षेत्र उरलं नाही की जिथे स्त्रिया आपला ठसा उमटवू शकल्या नाहीत. काही वर्षांपूर्वी वाहन चालवणे हे स्त्रियांना जमणार नाही असं म्हणणारे आपण आज प्रत्येक वाहन स्त्री चालवू शकते याची प्रचिती आपल्याला मिळते आहे. महिला ट्रक ड्रायव्हर आहेत, रेल्वे मोटर वुमन आहेत आणि रिक्षा चालवणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हा लेख लिहिताना भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या नासा संस्थेकडून अवकाश यात्रा करीत असताना तिच्या यानात काहीतरी बिघाड झाल्याने ती अवकाशात अडकल्याची बातमी आलेली आहे परंतु ती शूर वीरांगणा त्याही संकटावर मात करून अमेरिकेच्या तळावर सुरक्षितपणे उतरेल अशी आमची खात्री आहे.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ या संस्थेला सत्तर वर्षे पूर्ण झाली. गेल्या ७० वर्षात या संस्थेकडून राजापूर आणि लांजा तालुक्यातील खेडे गावांच्या विकासाकरिता सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. संस्थेच्या सुरुवातीच्या काळात महिला कार्यकर्त्यांचा अभाव होता. गेल्या काही वर्षापासून संस्थेत एका दुसरी महिला कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यायची मात्र गेल्या पंधरा वर्षापासून संस्थेत महिला कार्यकर्त्या मुख्य पदभार भूषवित आल्या आहेत. संघांची ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना राबवताना मुंबईवरून गावाकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा असतो याचा आम्हाला अभिमान वाटतो. संघाचा कोणताही पदाधिकारी हा प्रथम जमिनीवरचा कार्यकर्ता असतो.झाडू मारणे, खुर्च्या उचलणे यापासून कोणतेही सजावटीचं काम करण्यापासून सगळी कामं करायला संघ कार्यकर्ताच काय पण पदाधिकारीही हिरिरीने पुढे येत असतो. त्यामध्ये महिलाही असतात म्हणूनच संघाचे कोणतेही उपक्रम यशस्वी होण्यास मदत होत आहे.
( मिनल दिक्षित यांच्या बालगोष्टींच्या पुस्तकांचे प्रकाशन करतांना संघ सरचिटणीस प्रमोद पवार, डॉ.सूनिता बेंडसे,मिनल दिक्षित, हेमांगी अधाटे व कवयित्री वीणा चव्हाण)
संघाच्या महिला कार्यकर्त्यां सुशिक्षित असून नोकरी करून( काही सेवानिवृत्त )घर सांभाळून संघासाठी वेळ देणाऱ्या आहेत याचे आम्हास विशेष कौतुक वाटते. महिला सदस्यांची संख्या बऱ्यापैकी असल्यामुळे महिलांसाठी काही उपक्रम राबवणे यासाठी संस्था नेहमी पुढे असते मात्र यावेळी महिलांनी महिलांच्या कार्यक्रमाचे नियोजन करावे असं संघाकडून सांगण्यात आलं. महिलांचा कार्यक्रम बघण्यासाठी पुरुष कार्यकर्त्यांनीही अर्थात सर्व कुटुंबीयांनी यावं यासाठी संघ सदस्यांचे संमेलन आणि महिला मेळावा असा एकत्रित कार्यक्रम घेण्याचे ठरले.संघाच्या माजी सरचिटणीस श्रीमती स्नेहल आयरे यांच्याकडे महिला विभागाचे अध्यक्षपद देण्यात आले.
उपाध्यक्ष :- सौ. प्रांजल दत्तप्रसाद कोलते
सरचिटणीस:-सौ.पूर्वा प्रकाश मरचंडे
खजिनदार :- सौ. जया महेश कदम
सल्लागार:- सौ. मीनल भास्कर दीक्षित
सभासद:- १)श्रीमती. अश्विनी अनिल आयरे २) सौ. योगिता यशवंत बाईंग ३) सौ. माधवी सचिन तावडे ४) सौ.वृषाली विजय शिंदे.४) सौ.स्वाती खामकर ५) ॲड.सौ.ग्रीष्मा आयरे,५)सौ.माधुरी खामकर असे सर्व पदाधिकारी महिला एकत्र आल्या आणि त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केलं.
पवईतील पवई इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात रविवार २३ जून २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाच्या तयारीसाठी सकाळी साडेआठ वाजल्या पासून कार्यकर्ते उपस्थित होते. श्री गणेश चव्हाण, श्री सुरेश पेडणेकर, श्री विजय आयरे, श्री प्रमोद पवार, श्री सदानंद खामकर, श्री प्रमोद मेस्त्री, श्री विवेक लाड, मिलिंद कोटकर या मंडळीने सर्व पूर्व तयारी उरकली. ज्येष्ठ रांगोळीकार श्री जनार्दन खामकर यांनी सहज काढलेल्या रांगोळ्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.
दीप प्रज्वलन करून आणि राणी लक्ष्मीबाई च्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अलका नाईक महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहल आयरे, महिला मंडळाच्या सरचिटणीस पूर्वा मर्चंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीनल दीक्षित संघाचे जेष्ठ सदस्य तुकाराम चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रम पार पडला.
नृत्यदिग्दर्शिका माधुरी खामकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तर संघाच्या पदाधिकारी स्वाती खामकर यांनी प्रास्ताविक केले.पाहुण्यांची ओळख सुनिता महाडीक यांनी केली तर सत्कारमूर्तींची माहिती शरयू देसाई, स्नेहल आयरे यांनी दिली तर आभार प्रदर्शनाचे काम स्नेहल आयरे यांनी केले.संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात रंगमंचावर खुर्ची असत नाही हे वैशिष्ट्य आजही जपण्यात आलं.ईशस्तवन प्राजक्ता खामकर ननावरे,नाट्यछटा-सोनाली उकांडे,नृत्य-शिवाज्ञा आयरे व ब्रम्हास्मी लाड गीतगायन- साक्षी समिक्षा रामुगडे
,नाट्यछटा- वंश कांबळे,अंकिता होसनागर -भरतनाट्यम,नृत्य मयुरी इंगळे,,कविता वाचन-ज्ञानसंपदा हायस्कूल गोवंडीचे विद्यार्थी, गाणे- प्रचित देसाई असे विविध कार्यक्रम करुन मुलांनी आनंद लुटला तर महिलांमधून भक्ति गीत - रोशनी पेडणेकर,ब्रम्हविद्या ओळख -माधुरी साठे, दाक्षिणात्य नृत्य व विनोदी नाट्य
स्नेहा आयरे, मनाली चव्हाण यांनी सादर करुन खऱ्या अर्थाने महिला मेळावा यशस्वी केला.
ज्या महिलांनी विविध क्षेत्रात प्रशंसनीय कार्य केले आहे त्यांची यादी पुढीलप्रमाणे १)स्मिता गोपिनाथ जाधव ,२)श्रुत्तिका सिध्देश सावंत,३)अवंती सुरेश गोरिवले,४)सुवर्णा पवार,५)जया कदम,६)ॲड.ग्रीष्मा आयरे,७)ॲड.निकिता पंकज लाड,८)स्नेहा विलास आयरे,९)मनाली मनोहर चव्हाण,१०)हेमांगी अधाटे, ११)डॉ.सुनिता बेंडसे या महिलांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या सन्मा.श्रीमती रुचीताई माने व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.अलका नाईक यांनी आटोपशीरपणे आपले विचार प्रकट केले.सन्मान आणि फारच कमी भाषणे यामुळे सगळे सभागृह दुपारच्या जेवणाची वेळ ही विसरले.
संघाचे हितचिंतक आर. के. कॅटर्सचे मालक श्री रवि कुळये हे स्वतः जातीनं चहा नाश्ता आणि शाकाहारी व मांसाहारी भोजनाची सेवा देण्यासाठी उपस्थित होते.सभागृहात एका बाजूला मनाली चव्हाण यांचा खाद्यपदार्थांचा विक्री कक्ष तर किमया आयरे यांचा किमया इमिटेशन ज्वेलरीचा विक्री कक्ष व मीनल दीक्षित यांच्या स्वतःच्या पुस्तकांचा स्टॉल ठेवण्यात आला होता.दुपारच्या सुग्रास जेवणानंतर आजच्या कार्यक्रमात कला प्रदर्शन करणाऱ्या मुलांचा व महिलांचा सन्मान करण्यात आला.संघाच्या नियमानुसार ज्यांची सभासद होण्यासाठी शिफारस करण्यात आले होते त्यांना संघाचे सभासदत्व देण्यात आले त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सचिन तावडे पूर्व मर्चंडे जया कदम अश्विनी आयरे व स्वप्नाली पेडणेकर यांना सदस्य करून घेण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, योगदान दिले त्यांच्या प्रति आभार प्रकट करण्यात आले.
संघाचा हा तसा घाई गडबडीत झालेला कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. पुढील वर्षी अधिक चांगल्या रीतीने मोठ्या संख्येने महिला सदस्यांना सहभागी करून हा कार्यक्रम करावा या महिलांच्या विनंतीचा खचितच विचार केला जाईल. याच क्रियाशील महिलांना अधिक क्रियाशील महिला जोडल्या जातील याची खात्री वाटते.
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
महिला कर्तुत्वाला एकजूटीला शुभेच्छा आणि उत्तम कार्यक्रमानिमित्त महिला समिती प्रमुख आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐
ReplyDeleteराजापूर - लांजा तालुका नागरिक संघाच्या समाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महिलांना समाजिक आत्मभान देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. प्रतिकूल परिस्थितीतून नवीन सृजन घडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. लौकिक जगापलीकडील समाजिक बांधिलकीचा गोडवा त्या जपतायत.ही आशादायी गोष्ट आहे.......... अभिनंदन!!
ReplyDelete