Saturday, April 27, 2024

ऐतिहासिक नाटकाचा कोकण दौरा !

           कोकणात वर्षभर जसे सण, समारंभ, उत्सव असतात तसेच त्या उत्सवांत रंग भरण्याचे काम भजन, किर्तन,नमन,जाकडी, दशावतार,नाटक या प्रकारच्या कला सादरीकरणातून होत असते.दक्षिण कोकणात दशावतारी खेळांना अधिक महत्त्व असते तसे उत्तर कोकणात नमनाला जास्त पसंती असते.मध्य कोकणात नाटकांची परंपरा फार जुनी असून ती प्रत्येक पिढीने पुढे नेण्याचे काम केले आहे.तसे नाटकाचे व्यावसायिक, प्रायोगिक व हौशी असे प्रकार असून व्यावसायिक नाटक म्हणजे नावाजलेले कलाकार असे समिकरण असले तरी कोकणातल्या हौशी रंगभूमीवर बाळकडू घेतलेले कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर चमकतात.त्यातले अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही गावातल्या जत्रेतल्या रंगमंचावर येऊन कृतज्ञता व्यक्त करतात.
        नाटकाचे पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक कौटुंबिक असे कथा विषयानुसार प्रकार असून विषयाच्या मांडणी नुसार रहस्यमय, विनोदी, गंभीर असेही प्रकार असतात.तसे पुरुष प्रधान व स्त्री प्रधान हा ही एक प्रकारच म्हणावा लागेल तसे संगीत आणि गद्य हे ही वेगळे प्रकार आहेत.आधुनिक नाटकाच्या सुरुवातीला नाटकातील स्त्री भूमिका पुरुषच करीत असत.नटवर्य बालगंधर्व बेमालूम स्त्री भुमिका वठवणारे कलाकार म्हणून प्रसिद्धीस आले.तसे कोकणातल्या गावागावात असे बालगंधर्वांचा आदर्श जपणारे अनेक पुरुष कलाकार होते.विसाव्या शतकाच्या सत्तरच्या दशकापर्यंत कोकणात पुरुषच स्त्री पार्टी करीत असत.अस्मादिकांनाही १९७७ मध्ये वारणेचा वाघ या नाटकात चंद्रा ची भुमिका करण्याची संधी मिळाली होती.
          आधुनिक नाटकाचा शुभारंभ हा पौराणिक व संगीत नाटकांचा होता. खरे पाहता या नाटकातील नाट्यपदांनीच रसिकांना भुरळ घातली होती.आज अशी नाटकं होत नसली तरी त्या काळातील नाट्यसंगीत आजही पुन्हापुन्हा ऐकत राहावेसे वाटते.पुढे सामाजिक आणि ऐतिहासिक नाटके रंगभूमीवर आली.स्वातंत्र्याच्या चळवळीत देशप्रेमाने भारलेली नाटके अधिक प्रमाणात आली त्यात आपल्या ज्वलंत इतिहास जनतेपुढे ठेवून देशभक्त निर्मितीला चालना देण्यासाठी ऐतिहासिक नाटके तुफान गर्दी खेचू लागली.अर्थात कोकणातल्या खेड्यापाड्यातसुद्धा तीच परंपरा मूळ धरु लागली.काही उत्सवात केवळ ऐतिहासिकच नाटक सादर करायचे हा दंडक आज मितीस पाळला जातोय असे ऐकिवात आहे.ज्यांची स्वतःची नाटक निर्मितीची ताकद किंवा हौस होती त्यांनी पडद्यासहीत कपडेपट व ढाल,तलवार,भाले अशी सगळी सामुग्री संग्रहीत केली होती.
           पुढे व्यावसायिक रंगभूमीवर इतर नाटकांपेक्षा ऐतिहासिक नाटके खर्चिक ठरु लागली.त्यामुळे केवळ मनोरंजन हा उद्देश ठेवून सामाजिक  किंवा कौटुंबिक नाटके सादर करण्याची सुरुवात झाली.खेड्यापाड्यात आता स्त्री पात्राकरीता स्रियांनीच भुमिका करण्याची सुरुवात झाली आणि त्यांची सुपारी हा अधिकचा खर्च मंडळावर पडू लागला.ऐतिहासिक नाटकात दोन - तीन  स्रीपात्र म्हटल्यानंतर सहसा नाटक करावं या मतावर कुणी राहात नाही.त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांत अपवादानेच ऐतिहासिक नाटके झालेली दिसतात.खेड्यांची जशी स्थिती आहे तशी मुंबई पुण्यातल्या व्यावसायिक रंगभूमीचीही आहे.
        मात्र कोकणातल्या हौशी कलाकारांनी मुंबईत एकत्रीत येऊन ' महालक्ष्मी कला मंच, मुंबई ' या नाट्यसंस्थेची निर्मिती करुन केवळ ऐतिहासिक नाटके सादर करुन शिव इतिहास लोकांच्या पुढे सादर करण्याचे शिवधनुष्य गेली दहा वर्षे समर्थपणे पेलले आहे. व्यंकोजी वाघ, महासंग्राम,वीर शिवाजी व वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक कलाकृती सादर केल्या आहेत.सन २०२० मध्ये राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाने लांजा,पाचला,शिपोशी व नाटे या ठिकाणी त्यांच्या 'वीर शिवाजी '  या नाटकाचे प्रयोग आयोजित केले होते ते सर्व प्रयोग गर्दी खेचून गेले.मुंबईत नोकरी सांभाळून नाट्यकला जोपासताना केवळ शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचविण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या या मंडळींचे संघाला कौतुक वाटते.आजकाल आजी आजोबांना पारख्या झालेल्या मुलांना गोष्टी कुणी सांगायच्या हा प्रश्न संस्कारांचा विचार करतांना आपणास भेडसावत नाही का? आपल्या मुलांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा असं जर आपणांस वाटत असेल तर समग्र शिवचरित्र मुलांच्या समोर मांडायला नको का ? महालक्ष्मी कला मंच मुंबई 'यासाठी पुढे आला आहे.त्यांना ताकद देण्याच्या दृष्टीने,त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने संघाने ' वीररत्न बाजीप्रभू ' या नाटकाचे प्रयोग कोकणातल्या विविध गावात आयोजित केले आहेत.राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपणही सहभागी होऊन आपण आपल्या नजिकच्या प्रयोगाला हजेरी लावावी.  व इतरेजनांनाही सांगावे ही विनंती.
         आपल्या मंडळाच्या निधी उभारणीच्या कामासाठी या नाटकाचा प्रयोग आपणही ही लावू शकता.
            १) जि.प.प्राथ.शाळा वेरळ -  संपर्क 
महेंद्र साळवी               संजय (आबा) डाकवे
98903 06818.          98198 23033
सुरेश गुणे
 90496 49378

             २) माजी विद्यार्थी रंगमंच,पाचल - संपर्क 
किशोरभाई नारकर.        गायत्री साळवी
 7276788550.           94043 81886
सुशांत कविस्कर.          प्रा.विकास पाटील 
90 28 825629.          8793517614
वसंत प्रभुदेसाई 
94239 49142

         ३) स्वा.सावरकर नाट्यगृह ,रत्नागिरी -संपर्क 
दीपक नागवेकर.             अर्जुन नागरगोजे
99227 35500.           9403362447
शौकत गोलंदाज              दिगंबर शिंदे 
8408967786.              9028832006
महादेव लोटणकर             श्रद्धा कळंबाटे 
94205 25840.             94224 30362 
भार्गव घाग.                       योगेश कदम
9765098542.                +91 98601 93634


             ४) विद्यार्थी रंगमंच ,लांजा -संपर्क 
महेंद्र साळवी              विजय हटकर 
98903 06818.        88 06 635017
मंगेश चव्हाण               जयराज मांडवकर 
 73771 77191.         98601 87061
 संदीप हांदे.                विनोद बेनकर 
94 21 142916.      +91 94 23 297829

No comments:

Post a Comment