कल्पना कॉलेजने थोड्याच अवधीत नाव कमावलंय.हॉटेल मॅनेजमेंटच्या जोडीला नर्सींग,फॅशन डिझायनींग हे कोर्सही इथे असल्याने इथे शिकून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे ज्ञान मिळतेच त्याचबरोबर वेगवेगळ्या इन्स्टीट्युटना अभ्यासभेटीतून मुलांना समग्र देण्याचा प्रयत्न केला जातो.संस्थेत विविध उपक्रम सातत्याने राबवून मुलांच्या नेतृत्व विकासाला चालना दिली जाते.विविध संस्थांच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष जबाबदारी देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढविताना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनापासून या काॅलेजमध्ये शिकणारी मुले त्यांचे खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावतात. काही मुले स्वयंसेवकाचे काम करतात तसेच व्यासपीठावर एखादे सुंदर नृत्यही सादर करतात.त्यांचे फॅशन डिझायनिंग ची मुले स्वतः शिवलेले विविध पोषाख परिधान करून कॅटवाॅक करून जो कार्यक्रम करतात त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो. असे विविध अनुभव व व्यवसाय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्या मुलांना कामाचाअनुभव मिळावा म्हणून अनेक हॉटेल्स व हास्पिटलशी बोलून मुलांच्या नोकरीची व्यवस्थाही मंगेश चव्हाण करीत असतात. मुंबई, पुणे,कोल्हापूर आणि रत्नागिरीत अनेक मुलांना नोकरी मिळवून देण्याचे काम केले आहे.म्हणूनच आपल्या पाल्याचा भविष्याचा आधार म्हणून अनेक पालक या कॉलेजकडे बघत आहेत.

आता काॅलेज नव्या जागेत आणि अधिक विस्तीर्ण जागेत असतांना इन्फिगो आय केअर या नामवंत संस्थेचे पाठबळ मिळाले आहे ही फार मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल.सतत उपक्रमशील असणाऱ्या या काॅलेजला २०० प्रेक्षक बसतील असे सभागृह असल्याने लांजातील अनेक संस्था त्यांचे छोटेखानी कार्यक्रम करण्यास कल्पना काॅलेजला प्राधान्य देत असतात.
आज त्यांचा वाढदिवस आहे.त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कॉलेजमधून कोकण पर्यटन विकासास पुढे नेणारी पिढी निर्माण होवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
सुभाष लाड
९८६९१०५७३४









No comments:
Post a Comment