Monday, October 23, 2023

अर्जुना नदी जलपूजन २०२३

 

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ ,मुंबई या संस्थेचे ८ वे ग्रामीण साहित्य संमेलन राजापूर  तालुक्यातील तळवडे या गावी संपन्न झाले.संमेलनाच्या पूर्वसंध्येला या गावाच्या सिमेवरून जाणा-या अर्जुना नदीचे जलपूजन करण्यात आले.स्त्रियांनी डोक्यावर कलश घेऊन नदीकडे प्रयाण केले.जलकलश भरून काठावर आणून ब्राह्मणाकरवी त्याचे पूजन करून आरती करण्यात आली.

         मूर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नदीची स्वच्छता राखण्याचे प्रबोधन करणारे पथनाट्य सादर केले.त्यानंतर सर्व आबालवृद्ध नदीकाठावर आले व त्यांनी श्रद्धापूर्वक प्रज्वलीत दीप नदीप्रवाहात सोडले.
         हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता गावच्या सरपंच श्रीमती गायत्री साळवी,अमित साळवी,वसंत प्रभुदेसाई यांनी विशेष मेहनत घेतली.











No comments:

Post a Comment