नमस्कार मंडळी,
आपणा सर्वांचा आवडता दिवाळी सण अगदीच तोंडावर आलेला आहे. घराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि संसारासाठी लागणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपण सगळे व्यग्र असणार आहात. येणाऱ्या दिवाळीला आपण सगळेजण सामोरे जाताना गोड गोड पदार्थांची, फराळाची मेजवानी असणारच. आज-काल घरी पदार्थ करण्याची मौज काहींना नकोशी झाली आहे तर काही ना वेळ नसल्यामुळे तो आनंद आपण घेऊ शकत नाही याचा खेदही आहे.तरीही आपण घरगुती बनवलेले पदार्थ विकत घेऊन दिवाळीचा गोडवा चाखणार आहोत. तरीही दिवाळी वैचारिक व्हावी यासाठी गेले अनेक वर्षे मोडी लिपी मित्र मंडळ ' मोडीदर्पण ' हा दिवाळी अंक प्रकाशित करीत असते. यावर्षी पंधरावा दिवाळी अंक आपल्या घरी येण्यासाठी उत्सुक आहे.
गेली अनेक वर्ष मोडीदर्पण हा केवळ मोडी लिपी शिकणाऱ्यासाठी आहेच तसा तो मोडी लिपी शिकलेल्या जाणकार लोकांसाठी मोडी लिपीतले विविध विषयातले कागदपत्र आम्ही सादर करीत असतो. हे वर्ष पुण्यशील अहिल्याबाई होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती चे वर्ष असल्यामुळे त्यांच्या कामगिरी वरती प्रकाश टाकणारे मोडीतील व देवनागरीतील लेखांमुळे हा अंक संग्राह्य ठरणार आहे.कोकणचं वैभव, कोकणची समृद्धी विविध विषयातून मांडताना यावर्षी कोकणातील बोलीभाषांचा परिचय करून देणारे अनेक लेख आपल्याला वाचायला मिळतील. कोकणातील तलावे सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण स्थान मिळवून आहेत त्या तलावांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न या अंकामध्ये आहे. आपल्याकडच्या नवोदित साहित्यिकांना मोडी दर्पण दिवाळी अंकात स्थान देण्यासाठी यावर्षी ग्रामीण कथा स्पर्धेचा आयोजन केलेलं होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून निवडक तीन कथांना व काही उत्तेजनार्थ कथांना या अंकात स्थान देण्यात आलेलं आहे. काही नामवंत कवींच्या कविता आपल्याला आनंद देतील. तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार अच्युत पालव गेली अनेक वर्षे मोडीदर्पणचे मुखपृष्ठ साकारीत असतात.
त्यामुळे अंकाला विलोभनीयता प्राप्त झाली आहे. चित्रकार सुनील वागळे यांच्या रेखाचित्रांमुळे आतील साहित्य वाचनाची ओढ निर्माण करील. एकंदरीत संपूर्ण अंक हा दर्जेदार झालेला आहे हे आपण अंक आपल्या हाती पडताच बोलाल याची खात्री वाटते.
अंकाची किंमत रुपये २५० आहे मात्र याच किंमतीत हा दिवाळी अंक आम्ही आपणास घरपोच करणार आहोत. सोबत क्यू आर कोड दिलेला आहेच. याद्वारे अंकाची किंमत भरून आपला पोस्टाचा पत्ता पिन कोड सहित आपण खालील व्हाॅटसअपवर पाठवून दिलात तर योग्य वेळेत आपल्याकडे अंक पोहोचवता येईल. विजय हटकर- +918806635017
गणेश चव्हाण- 09323431092
विराज चव्हाण - +91 99 87 954937
सुनील कदम - 94046 06882
विजय बाराथे - +91 80 07 075366
No comments:
Post a Comment