Tuesday, August 13, 2024

घर- घर तिरंगा

        
           भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक घरासमोर आपल्या देशाचा तिरंगा ध्वज फडकवायचा हा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय खरंच स्तुत्य आहे. दीडशे वर्षे या देशावरती इंग्रज सरकारने राज्य केलं त्या सरकारला भारत देशातून हाकलून लावण्यासाठी दीडशे वर्ष भारतीय जनता संघर्ष करीत राहिली. कुणी आयुष्यभर तुरुंगात खितपत राहिले. कुणी इंग्रज  सोजीरांच्या अनन्वित छळाने अपंग झाले, कुणी गोळीचे शिकार झाले तर कोणी फासावर लटकले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले मात्र या देशाला १९४७ च्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. 
         भारताने लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करण्याचे ठरवले. जात-पात धर्म भेद सर्व बाजूला ठेवून या देशातील प्रत्येक नागरिकाला सुखाचे जीवन जगता यावे यासाठी कायदे कानून करण्यात आले. त्यांचं पालन करण्यात आले. पुन्हा एकदा या देशाच्या प्रत्येक घरातून सोन्याचा धूर निघावा असं स्वप्न बाळगून राज्यकारभार हातात घेतला गेला मात्र स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झाली तरी सामान्य नागरिकाच्या जगण्याच्या अडचणी मात्र संपल्या नाही. ज्यांनी तळहातावर शीर घेऊन रणांगण स्वीकारले त्यांनी बाळगलेले या देशाच्या भवितव्याचे स्वप्न आज साकारताना दिसतेय का ? भ्रष्टाचार, लाच- लुचपत आणि स्वार्थ यातच आपण गुंतलो आहोत. जगण्यातली साधन शुचिता आपण विसरलो आहोत तरीही आशा आहे या देशाचा उज्वल इतिहास पाहिल्यानंतर आज ना उद्या आपला देश संपन्नतेकडे वाटचाल करील.
       आपल्या घरासमोर फडकणारा तिरंगा नव्या पिढीचं कुतूहल जागं करील, जुन्या पिढीतील लोकांनी नव्या पिढीला हा तिरंगा फडकत ठेवण्यामागचा इतिहास  सांगावा, नव्या भारताचे स्वप्न काय आहे याची त्यांना जाणीव करून द्यावी त्यातूनच उद्याचा सुजाण नागरिक तयार होईल अशी अपेक्षा आहे म्हणूनच ' हर घर तिरंगा'  ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
          मी लिहिलेले गीत आपल्यास आवडल्यास आपण जरूर त्याबद्दल लिहावे. 
आपला 
सुभाष लाड 
अध्यक्ष 
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई
९८६९१०५७३४


'घर घर तिरंगा' या गाण्याची लिंक copy करा.व यु ट्यूब वर वाजवा.

https://youtu.be/Fy_rXFBd4G8?si=-s3ZC6nPyImJRVS2


No comments:

Post a Comment