सरकारी नोकरी म्हणजे एकदा चिकटलो की आयुष्यभराची चिंता मिटली अशा प्रकारची भावना आमच्या मराठी मनाची होऊन गेलेली होती परंतु आता याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे बराचसा तरुण वर्ग हा उद्योग धंद्याकडे वळतो आहे हे एक आशादायी चित्र आहे.
अशा ध्येयवादी तरुणांसाठी पितांबरीचे संस्थापक मा. रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा जीवन प्रवास .प्रेरणादायी ठरणारा आहे. ३५ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पितांबरी या उद्योगधंद्याची सुरुवात केली त्यावेळेला त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले त्याची चिंता न करता ते चालत राहिले. आज ३५ वर्षानंतर पितांबरी उद्योगधंद्याचा शंभर करोडचा टप्पा पूर्ण करतांना त्यांनी आपली उत्पादने ही वाढवली. त्यांची संख्या आज सत्तरच्या घरात आहे. दीड हजार कर्मचाऱ्यांचा संसार सांभाळताना पितांबरीची उत्पादने हे केवळ भारतातच नाही तर आजूबाजूच्या वीस देशांमध्ये त्यांचा खप होतोय. पाच लाख दुकानांमध्ये पितांबरी सन्मानाने बसली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर रवींद्रजी प्रभू देसाई ना जाणून घेण्याची कुणालाही इच्छा निर्माण होते. आपल्या दूरदर्शन वरील सह्याद्री वहिनीने नुकतीच त्यांची मुलाखत प्रकाशित करून अनेकांना रवींद्रजी प्रभुदेसाई ना जाणून घेण्याची ती इच्छा पूर्ण केली आहे. पाहूया तर त्यांची मुलाखत.
अर्थ संवाद -
https://www.facebook.com/share/v/jEKwiStb7NieZn6H/?mibextid=qi2Omg
( माचाळचे सुपुत्र श्री अशोक पाटील व श्रीमती जयश्री पाटील - खर्डे तसेच संघाच्या कार्यकर्त्यांसोबत पितांबरीकार )
रत्नागिरीतील थंड हवेचे ठिकाण 'माचाळ' येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने दि.१ऑगस्ट २०२४ रोजी मा.रवींद्र प्रभुदेसाई भेट घेण्यांत आली.
" कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार निर्माण करून देण्यासाठी गेली अनेक वर्ष मा. रवींद्र प्रभू देसाई हे कार्यरत आहेत. आपण माचाळ मध्ये सुद्धा असेच काही उद्योग आणू जेणे करून माचाळ मधल्या तरुणांना माचाळमध्येच पैसा कमवता येईल असे आश्वासीत केले."
No comments:
Post a Comment