जागतिक जल दिनाच्या निमित्ताने दैनिकांत तसेच नियतकालिकात अनेकजण पाण्याच्या समस्या आणि तदनुषंगिक उपक्रमांवर चर्चा होईल.शहरात कुठल्यातरी सभागृहात चर्चासत्र होतील.सरकारकडून या दिवसासाठी ठेवलेला निधी खर्च होईल.दुसऱ्या दिवशी दुसरा जागतिक दिनाचे लगबग सुरू होईल.एक व्हॅलेंटाइन डे सोडल्यास कोणत्याही जागतिक दिनाचे महत्व हे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न यापलिकडे असत नाही.त्यामुळे समस्या जाग्यावरच आहेत.जल दिनाचे औचित्य साधून एखाद्या पात्रात उतरून नद्यांचे गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला असता तर अनेकांना जलाशयाचे महत्व लक्षात आले असते.
- नुकतेच लांजा तालुक्यातील शिपोशी या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गावात राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे ९वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पार पडले.त्या गावातून वाहणाऱ्या व सध्या वाळूने भरून गेलेल्या नदीकडे शासनाचे लक्ष जावे म्हणून तसेच ग्रामस्थांनी नदीला देवस्वरूप मानून नदीत कचरा टाकू नये हा संदेश देण्यासाठी संमेलनाच्या पूर्व संध्येला समस्त
- ग्रामस्थांनी नदीचे शास्त्रोक्त पूजन केले.
- राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ हा गेली सत्तर वर्षे लांजा व राजापूर या दोन्ही तालुक्यात सामाजिक उपक्रम करीत असतो. सन २०१४ पासून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करीत असतो.सन २०१५ पासून गावखेड्यातल्या नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ देण्यासाठी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करीत आहे.सन २०२३ मध्ये राजापूर तळवडे येथे पार पडलेल्या संमेलनाच्या पूर्व संध्येला अर्जुना नदीच्या पात्रात जलपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला व त्याचे अनेकांकडून महत्व अधोरेखित केले गेले. जलपूजनाचा दुसरा कार्यक्रम सर्वपित्री अमावास्येचा मुहूर्त साधून रायपाटण येथे अर्जुना व निवाचा नदीच्या संगमावर पार पडला.पाचल , तळवडे व रायपाटण येथील आबालवृद्धांनी यात सहभाग देऊन त्यास उत्सवाचे स्वरूप दिले.
- जलपूजनाचा तिसरा कार्यक्रम शिपोशी ग्रामपंचायतीत असलेल्या बोरिवले या ग्रामस्थांनी काजळी नदीच्या पात्रात २९ फेब्रुवारी २०२४ च्या दिवेलागणीच्या मुहूर्तावर पार पडला.या गावाने तर तो आपल्या गावचा महत्वाचा सण असल्यागत तो साजरा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेच.तसेच त्याच गावातील नवोदित शाहिर प्रशांत खांदारे याचा प्रथमच शाहिरीचा कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली.
- पूर्वी सारा गाव नदीवर अवलंबून होता. प्रत्येक जण प्रत्यक्ष नदीत उतरत होता.पुढे घरोघरी नळ योजना आली आणि नदीवरचा वावर संपला.त्यामुळे कोंडीत पाणी आहे की दगड भरलेत हे कुणी पाहिलेच नाही. जेव्हा नदी वाहायची थांबली तेव्हा लक्षात आले नदी संकटात सापडली आहे.
- शहरवस्तीकडे आकर्षिला गेलेला माणूस गावाकडे परत येत नाही कारण कष्ट करणे आवडेनासे झाले आहे तसे ते लाजिरवाणे वाटू लागले आहे.खुर्चीवर बसून नोकरी करणाऱ्यांने स्वत: उठून पाणी घ्यायचे नाही,कोणीतरी त्याला ते जाग्यावर मिळायला हवे.हे काही वेळा आवश्यक ठरत असले तरी तो इज्जतीचा विषय असत नाही. पण आपण तो केला आहे.
मोठमोठ्या बंगल्यात राहणारे लोक स्वत:चीन बाग स्वत: फुलवितात व आनंद घेतात.दहा हजाराचा पगार घेणारा तरूण फावल्या वेळात कडक इस्त्रीचे कपडे करून गप्पांचा फड रंगवतो. आजकाल मोबाईल हे चांगले खेळणे त्यांच्या हातात आल्याने तो सर्वकाळ व्यस्त आहे.मग नदीवरच पाणी आणणं सोडा घरातील घागर सुद्धा तो झाडात ओतायला पुढे येत नाही.त्यामुळे नदी सध्या एकांतवासात आहेत.तिचे वाहणेच थांबल्याने ती आक्रसली आहे.
सुभाष लाड
२२।०३।२०२४
शिपोशी .......
बोरीवले , काजळी नदी पात्रात .......
जागतिक जल दिनाच्या शुभेच्छा देतांना सर्वजण नदीवर प्रेम करू लागतील अशी अपेक्षा करतो.
.












No comments:
Post a Comment