कोकणातील प्रत्येक गावात पुरेशा प्राथमिक शाळा आणि पंचक्रोशीत किंवा दशक्रोशीत हायस्कूलची व्यवस्था असल्याने इथले साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक असले तरी पाठ्यक्रमाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणा-या शिक्षक आणि संस्था अभावाने आहेत.साहित्य संमेलनासारख्या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडेल अशी चिंता व्यक्त करणारेही आम्हांस भेटले तर कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक कमी झाल्याने त्यांना वर्गाबाहेर काढता येणार नाही असे ऐकताच स्पर्धा परीक्षांत आमचा टक्का कमी का आहे याचा शोध लागला.
गेल्या सात साहित्य संमेलनांचा विचार करतांना यावेळेला मंडप बांधण्याऐवजी एखाद्या मोठ्या सभागृहाचा विचार करावा जेणे करून आयोजकांवर खर्चाचा भार कमी होईल.तळवडे गावात मुख्य रस्त्यालगत 'प्रभावती मंगल कार्यालय 'सर्व सोयींनी युक्त असल्याने तिथेच जागा निश्चित झाली.संजय सुतारांनी मग मोर्चा वळवला तळवडे गावचे धुरीण आप्पा साळवींकडे.साहित्य संमेलनाचा उद्देश आणि त्याचं नेमकेपण त्यांना समजावून सांगितले.आप्पा साळवींनी तर पहिल्याच भेटीत होकार दिला व ग्रामस्थांशी बोलून नियोजन करूया असे सांगितले.लवकरच त्यांनी ग्रामस्थांची बैठक बाेलावली.बीनविरोध नवनिर्वाचीत सरपंच मा.श्रीमती गायत्री साळवी यांनी समस्त ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ व संघाचे पदाधिकारी उपस्थित असलेल्या बैठकीत संघाच्या ८ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद तळवडे गाव स्विकारीत असल्याचे जाहिर केले.तळवडेच्या ग्राम वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाची घोषणा झाली आणि ख-या अर्थाने सगळेजण तयारीला लागले.
पूर्वी अर्जुना नदीच्या पात्रात तळवडे गावात आठवडी बाजार भरत असे .पुढे तो पाचल भागात आला आणि वाढतच गेला.पण ख-या अर्थाने तळवडे गावाची प्रसिद्धी ही रवींद्र प्रभुदेसाईंच्या पितांबरीमुळे झाली.त्यांच्या या उद्याेगाने त्यांचे जगभर नाव केले तितकेच त्यांच्या उद्योगामुळे तळवडे गाव व परिसरातील अडिचशेच्या आसपास भूमीपुत्रांना गावातच राहून रोजगार मिळाला हे महत्त्वाचे वाटते.रत्नागिरीतील गद्रे मरीन कंपनीत कोकणातीलच मुलांना रोजगार दिला जातो या गोष्टींचा आम्हास वाटतो.त्यांचा हा आदर्श कोकणातील इतर उद्योजकांनी घेऊन इथल्या तरूणांना इथेच रोजगार उपलब्ध केल्यास कोकणातील अनेक बंद घरे उघडी राहण्यास मदत होईल.ग्रामीण मराठी साहित्य संमेलन याच गोष्टींना अधोरेखीत करण्याचे काम करते हे जेव्हा ग्रामस्थांना पटते तेव्हा ते या संमेलनाच्या प्रेमात पडतात.
तळवड्याचे स्व. सीताराम वामन देसाई ज्यांनी रायपाटण येथील आरोग्य केंद्राच्या उभारणीत परिश्रम घेतले ते संघाच्या संस्थापकांपैकी एक आहेत हे जेव्हा ग्रामस्थांना सांगितले तेव्हा त्यांना संघ हा आपलाच आहे हे वाटू लागला.त्यामुळे वेळ कमी असला तरी संमेलन धुमधडाक्यातच होईल याची खात्री वाटली.तळवडे ग्रामस्थांच्या सोबत संघाचे कार्यकर्ते व अनेक संमेलनात सहभागी झालेले पाचलचे किशोरभाई नारकर,सिद्धार्थ जाधवसर तसेच नव्याने जोडले गेलेले पण अनुभव संपन्न संदीप परटवलकर सर हे सोबत असतांना काळजी काम नाही.त्यात सभागृह आणि जेवणावळीचा भार संजय सुतारांनी मोठ्या मनाने स्वत:च स्विकारल्याने चिंतेची बाब तशी राहिली नाही.
दहा वर्षापूर्वी कोकणची मानसिकता बदलण्यास साहित्य संमेलन कारण ठरेल हा आम्ही बाळगलेला आशावाद आता खरा ठरू लागला आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यासपिठावर आपल्याला स्थान असेल तरच आपला पूर्वतयारीत सहभाग असेल ही मानसिकता आता बदलली आहे.बीन खुर्चीचं साहित्य संमेलन आता अनेकांना रूचू लागलंय.कामानेच माणूस मोठा होतो त्यासाठी पदाची किंवा खुर्चीची गरज भासत नाही हे ही पटू लागलंय.आम्ही सगळेच कर्तबगार आहोत.आमच्यात लहानमोठा हा भेद असणार नाही तर ज्याची वेळ येईल तो व्यासपीठावर जाईल.त्याच्यासाठी मी टाळी वाजवीन तर माझ्यासाठी तोही टाळी वाजवील हा विश्वास घेऊन लोक जेव्हा कामाला वाकतात तेव्हा कुठेही कुणाला कमीपणा वाटत नाही. प्रत्येकाला माझं काम अधिक उजवं झालं पाहिजे ही स्पर्धा बघायला मिळते.भविष्यात सार्वजनिक जीवनात हे चित्र अधिक आनंददायी असेल अशी खात्री वाटते.
सार्वजनिक उपक्रम म्हटला की कितीही वेळेपूर्वी पूर्वतयारी पूर्ण करायची असं ठरवलेलं असलं तरी शेवटच्या दिवसांतली लगबग असेल तरच कार्यक्रम असल्याचे चेह-यावर दिसते.जेव्हा चेहरे बोलू लागतात तेव्हा कार्यक्रम यशस्वी होणारच हा आशावाद मूळ धरू लागतो.तळवडे ग्रामवासीय सुरूवातीला चाचपडल्यागत वाटत होते. पण क्रांतीज्योतीच्या निमित्ताने जमलेल्या लोकांचा उत्साह पाहिला आणि संमेलन उत्सवी वातावरणात संपन्न होणार याची खात्री वाटली.
नव्या गावात नवीन माणसं भेटतात.लोकसंग्रह वाढतो त्याचबरोबर प्रत्येकाच्या अनुभवाची शिदोरी आपल्या गाठीस येते आणि बरंच काही शिकायला मिळतं.या परिसरात अगदी पुढील चारदोन वर्षांत शतकाची आयुमर्यांदा ओलांडण्यास उत्सुक असलेली,हिंडती फिरती माणसं भेटली.आपसुक आमचे हात त्यांच्या चरणांवर वाकले.माझा समाज निरोगी असल्याचा तिथं प्रत्यय आला.कोणताही गाव गावातल्या धुरीणांच्या विचारांचा पाईक असतो.ज्यांना त्याचे महत्त्व पटले तेच त्या साखळीत राहून गावचा विकास साधू शकतात.मीच शिवाजी असे प्रत्येकजण म्हणतो तेव्हा गाव भरकटतो.तळवडे गाव शांत,शिस्तप्रिय विशेषत: क्रयशक्तीचा उपयोग करून स्वत:चे जीवन फुलवतांना दिसतोय.पितांबरीच्या निमित्ताने उद्याेगाची संधी आली तिचाही योग्य रितीने उपभोग असल्याचे आढळले.
गावात विविध क्षेत्र असतात.त्या त्या क्षेत्रात ती ती माणसं काम करीत असतात.परंतु गावसमाज म्हणून गावाच्या भल्यासाठी म्हणून गावातल्या सगळ्याच क्षेत्रांना मार्गदर्शन करणारी मंडळी असतात. तळवड्यातले आप्पा साळवी,महादेव गवस,सुरेश गुडेकर,पंडितसर,वसंत प्रभुदेसाईसर ही आणि अनेक मंडळी मला इथे एकोप्याने वागतांना दिसली.सोबत तरूणांना घेऊन नव्या विचारांचाही आदर करतांना दिसली. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या फंदात नपडता,सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासाला महत्त्व देत बिनविरोध सदस्य पाठविले.माझ्या दृष्टीने हे एक आदर्श गाव आहे. या गावात ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होतं आहे.त्यानिमित्ताने मला गावात वावरता आले हे माझ्यासाठी भाग्याचं आहे.
तळवडे वासियांचा मी मनापासून आभारी आहे.

सुभाष लाड
ग्रंथदिडीतील बैलगाडीत संमेलनाध्यक्ष
संमेलनात सहभागी महिला कार्यकर्त्या
संमेलनात असे विक्री कक्ष असतात.
नववधुंचा आहेर देऊन सन्मान केला जातो.
आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने संमेलन गाजवणा-या युवती
संमेलन यशस्वी झाल्यानंतर विसावलेले कार्यकर्ते
पहिल्या रांगेत मान्यवर
वय वर्षे ९५ ,यथोचीत सन्मान
मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम
प्रथितयश साहित्यिकांचे विचार
पुस्तक प्रदर्शनातील एक कक्ष
संगीत मेजवानी
रसिकांची मांदियाळी

No comments:
Post a Comment