आज पुन्हा एकदा अक्षय आयरे करीता ब्लॉग लिहित आहे.कारण त्याचा निखळ आनंद देणारा,अडीच तास आपल्याला बसल्या जागी खिळवून ठेवत नृत्याची, अविट गाण्यांची मेजवानी देत रामायण काळात घेऊन जातो तो ' सुस्वागतम् रामराज्यम ' हा कार्यक्रम घेऊन अक्षय आयरे पुन्हा आपल्या भेटीला येतो आहे.
*********" १४ जून रोजी सायंकाळी ७ वा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात,दादर पश्चिम व १६ जून रोजी सकाळी १०.३० वा.मीरा रोड येथील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह येथे असे दोन खेळांचे नियोजन आहे.*****************
अक्षय आयरे हा आमच्या रिंगणे गावचा सुपुत्र आहे.त्याचे आजोबा स्वातंत्र्यपूर्व काळात नोकरीनिमित्ताने मुंबईत आले.इथेच त्यांनी घर संसार थाटला.त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलांना घेऊन आपल्या रिंगणे गावी जाता आले नाही.त्यांच्या मुलांनी आपल्या मुलांना आपण रत्नागिरीतील रिंगणे गावचे आहोत हे सांगितले पण त्यांनाही आपल्या मुलांना आपल्या मूळगावी नेता आले नाही.दोन वर्षांपूर्वी अक्षयने माझ्या एका कलाकार मित्राकडे त्याने आपण रिंगणे गावचे आहोत हे सांगितले त्यावेळी त्याने माझ्याशी बोलणं करून दिलं आणि ते कुटुंब माझ्या संपर्कात आले.
अक्षयच्या कार्यक्रमाबाबत अक्षयची आई श्रीमती रीमा आयरे माझ्याशी बोलत असते.असाच दादर येथे कार्यक्रम असतांना मी तो कार्यक्रम पाहिला. माझ्यासोबत सारे सभागृह स्वर्गीय सुख काय असते हे अनुभवत होते नव्हे त्या आनंदात न्हाऊन घेत होते.कार्यक्रम संपल्यानंतर अनेक मान्यवर रंगमंचावर जाऊन त्याचे कौतुक करीत होते .मी हे सगळं पाहात असताना माझी छाती अभिमानाने फुलून आली होती कारण हे बावनकशी सोनं माझ्या रिंगणे गावचं आहे हे मला माहित आहे.
तमाम रिंगणे वासियांनाच नव्हे उभ्या रत्नागिरीला नव्हे तर अवघ्या कोकण वासियांना गर्व वाटावा अशा ताकदीचा कलाकार आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध आणि श्रीमंत करण्यासाठीं दिला आहे याचा अभिमान बाळगावयास हवा.सुप्रसिद्ध गीतकार ग.दी.माडगूळकर यांच्या समृद्ध लेखणीतून अवतरलेले व सुधीरजी फडके यांनी स्वरबद्ध करुन अजरामर केलेले रामायण हा मराठी सारस्वतांच्या लाभलेला हिरा आहे.तो हिरा मिरवण्याचे आव्हान धारिष्ट्य अक्षय आयरे याने स्विकारले व तेवढ्याच नम्रतापूर्वक ते जनता जनार्दनाच्या चरणी वाहण्याचे कौशल्य अक्षयकडे आहे. म्हणूनच भले भले त्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी येतात.आणि जातांना तृप्त मनाने अक्षयचं कौतुक करुन आशीर्वाद देतात.
अयोध्येला राम लीला विराजमान झाले आहेतच.कुणी अयोध्येला जाऊन दर्शन घेऊन आले असतील,कुणी त्या प्रतिक्षेत असतील.त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे.एक जीवंत रामायणाचा अनुभव घ्यायचा असेल तर एक वेळ अक्षय आयरे यांचं ' सुस्वागतम् रामराज्यम् 'बघाच आणि हो मुलांना आणलेत तर ती आनंदी होतीलच पण अक्षय आयरे आणि त्यांच्या कलाकारांसारख नृत्य करावं असं त्यांना वाटू लागेल.नाहीतरी मुलांना मोबाइल पासून दूर कसे करावं हा प्रश्न तुम्हाला सतावतोय ना ?
सुभाष लाड
९८६९१०५७३४
कार्यक्रमाची तिकिटे '' तिकिटालय '' या अॅपवर उपलब्ध आहेत.
बोल कौतुकाचे
अक्षयच्या कर्तृत्वाचे---
https://youtu.be/sOVKqmh3caI?si=2KSN6F-zarRedeeX
काॅपी करून वाॅटसअप वर घ्या व पहा.
******* अभिप्राय ********
१)
शुभाषजी, माझ्या आईच्या माहेरच्या
गावचं हे नक्शीकान्त बावनकशी
सोनं आम्हा रिकोकुझ या परिसर
वाशिय, तसेच संपुर्ण महाराष्ट्र आणि
हिन्दुस्थानभर अक्षर आयरे यान्चा जो आपण परिचय करून दिला आहात त्याबद्दल आपले खूपखूप
मनापासून सहृदय अभिनंदन!
शुभाषजी, खरंच आपल्या हाती
एखादा लाल मातीचा कणही जरी
लागला ना, तर त्याचं परिशस्पर्शा
प्रमाणे सोनं करून सोडता हो!
असंच आपलं प्रेम माया आपल्या
लाल मातीवर कायमच राहो !
ते आहेच म्हणा,ते वृद्धिंगत राहो !
आपणास खूपसारे धन्यवाद!
विश्वनाथ चव्हाण,कोंडगे
सामाजिक कार्यकर्ते
२)
अक्षय आयरे...
अभिनय करून कीर्तनकार आहेत . एक तरुण कीर्तनकार असल्याचे अभिमानाने सांगावेसे वाटते.
आपल्या टीम मध्ये हे असे हिरे आहेत जे खऱ्या अर्थाने समाजासाठी चमकतात....मेहनत घेतात....
सर्वाचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन.....👍
सुनील वागळे
चित्रकार,भांडूप
No comments:
Post a Comment