ज्यांनी नवव्या साहित्य संमेलनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली ते श्री. हरेशजी जाधव काल पवईला माझ्या घरी येऊन गेले.ते त्यांच्या पुतणीच्या साखरपुड्याकरीता मुंबईत आल्याचे कळले.पुतणी काय करते असे विचारताच त्यानी दक्षिणेकडील सिनेमात ती काम करते असे सांगत परवा अभिनेता सिद्धार्थ जाधव घरी येऊन शुभेच्छा देऊन गेल्याचा फोटोही मला पाठवला.
' आपल्या मातीतील माणसांना आम्हीच मोठं करणार ' हा संदेश देणाऱ्या साहित्य संमेलनात आपण या मुलीला व्यासपीठ देऊन तिच्या जन्मगावच्या मातीकडून तिचा गौरव करण्याचे क्षण गमावल्याचे शल्य बोलून दाखवतांना "तुम्ही हे आम्हांला का सांगितले नाही ?" या माझ्या प्रश्नावर कोकणी माणसासारखे ठरलेले उत्तर दिले.
" माझ्याच पुतणीचं मीच कौतुक करावं हे उचित वाटलं नाही."
" पण कुणीतरी सांगितल्याशिवाय इतरांना कळावं कसं ? हा प्रश्न ही तितकाच महत्वाचा नाही का ?"
" माझ्याच पुतणीचं मीच कौतुक करावं हे उचित वाटलं नाही."
" पण कुणीतरी सांगितल्याशिवाय इतरांना कळावं कसं ? हा प्रश्न ही तितकाच महत्वाचा नाही का ?"
'आता वेळ निघून गेली,पुढच्यावेळी जरूर विचार करू या ' यावरती चर्चा थांबली.बोलता बोलता मी माध्यमावर ' तेजश्री जाधव ' शोधलं.दक्षिणेकडील चित्रपटात नाव कमवून प्रथमत:च ' बलोच ' या मराठी चित्रपटात काम करणारी तेजश्री जाधव हिच्याबाबत आलेले वृत्त वाचायला मिळाले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि अनेक रत्नांना जन्म देऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून,भारतीय मुद्रण क्षेत्र,न्यायसंस्था ते कला - सांस्कृतिक इतिहास मांडायचा असेल तर शिपोशी गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा नामोल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.त्या मालिकेत आजच्या पिढीतील अभिनेत्री तेजश्री जाधव आपले स्थान पक्के करते आहे हे शिपोशीकरांना अभिमानास्पद आहे तसे संघालाही आहे.
तेजश्रीला पुढील वाटचालीकरीता मनापासून शुभेच्छा !
सुभाष लाड
तेजश्रीला पुढील वाटचालीकरीता मनापासून शुभेच्छा !
सुभाष लाड
तेजश्रीचा साखरपुडा नुकताच शिपोशीकरांच्या पद्धतीने पार पडला.







No comments:
Post a Comment