आज राजापूर तळवडे येथे एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता.काल सायंकाळी सात वाजेपर्यंत मी घरीच होतो.रेल्वेगाडीने प्रवास करण्याची कोणतीही संधी नव्हती.मला आरक्षीत जागा मिळाली तरच मी प्रवास करतो.कारण सकाळी उठून मला कुठल्यातरी कामाला किंवा कार्यक्रमाला जाताना उत्साहात जायचं असतं.आणि आता तर 9 व्या साहित्य संमेलनात एवढी धावपळ झाली होती त्याचा शीण अजुनही जाणवत असल्यानं मुलानं खाजगी गोवा बस मध्ये शयनकक्ष असलेली तिकीट काढली आणि रात्री 9 वा.चेंबूरला गाडीत बसलो.चांगली झोप मिळाली. म्हणूनच ताजातवाना चेहरा घेऊन सभा स्थळी पोहोचलो.निवेदक मला ओळखत होते.एरव्ही संघाचे अध्यक्ष म्हणून ओळख करणारे त्यांनी शिपोशी येथे संपन्न झालेल्या 9 व्या साहित्य संमेलनाचे सर्वेसर्वा म्हणून ओळख केली.सहज मला अपराधी वाटलं.कितिक हात इथे राबले.अनेकांच्या सूचनाही उपयुक्त ठरलेल्या असतात. मग संमेलनाचे श्रेय एकट्याला कसे देऊ शकतात? त्याशिवाय त्यांनी संमेलनात हजेरी लावली होती का ?बरे आठवे संमेलन यशस्वी करण्यात त्यांचाही सहभाग होता.ते ही संमेलन नेत्रदीपक झाले होते.या सर्व प्रश्नांची उत्तरे कार्यक्रमानंतर निवेदकाकडून जाणून घ्यायची असे मी ठरविले.
कार्यक्रम पुढे सरकत होता.माझ्या भाषणात मी पुस्तकाबाबत व लेखकाबाबतच बोललो कारण ते समयोचित होते. मात्र संपूर्ण कार्यक्रम शिपोशी आणि तिथे उपस्थित असलेल्या 9व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्याभोवती घुटमळला होता.पाहुण्यांमध्ये श्री. चंदूभाई देशपांडे होते. त्यांना संघाने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर सुरेश गुडेकर व आप्पा साळवी यांना अनुक्रमे अक्षर रत्न व बॅ.नाथ पै पुरस्कार दिला आहे.या तिघांचाही तिथे तळवडे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला गेला. त्यांनी केलेल्या भाषणात पुन्हा शिपोशीचा उल्लेख अपरिहार्यच होता.बरे गेल्यावर्षी याच गावाने याच कार्यकर्त्यांनी 8 वे साहित्य संमेलन यशस्वी केलं होतं.त्यांना पूर्व तयारीला वेळ कमी मिळाला होता तरीही त्यांनी जय्यत तयारी केली होती.शिपोशीतही मोठ्या संख्येने ही मंडळी आली होती.शिपोशीने भव्यता दाखवत सगळ्याच बाबतीत उत्तम कामगिरी केल्याचं कौतुक करून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता.
मी माझ्या अध्यक्षीय भाषणात " संघाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली तशी ती नेहमीच घेत असतात त्यांचे आभार मानण्याची गरज नाही कारण त्यांच्या उपक्रमात त्यांचे राबणे अपरिहार्य आहे परंतु ज्या गावात आपण संमेलन घेत असतो त्या गावातील वा परिसरातील लोकांनी हे संमेलन आमचे आहे असे समजून मैदानात उतरणे गरजेचे असते ते शिपोशी व परिसरातील लोकांनी अधिक उठावदार केल्याने 9 वे संमेलन अधिक लक्षणीय ठरले आहे.त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच ठरतील."असे म्हटले होते.पुढे जाऊन मी कौतुक करणे ही गरजच आहे पण जेव्हा कुठल्यातरी दुरच्या गावात गेल्यानंतर त्या संमेलनाचे कौतुक होते याचा अर्थ ते कौतुक शिपोशी व परिसरातील लोकांचे कौतुक असते आणि ते मी प्रत्यक्ष ऐकतो तेव्हा संघाचा अध्यक्ष म्हणून मला आनंद होतोच त्यापेक्षा शिपोशी गावचा माजी विद्यार्थी म्हणून अभिमानाने ऊर भरून येतो.कालच्या श्री. रंगनाथ सप्रे यांच्या 'विंरगुळा' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मला तो आनंद लुटता आला म्हणूनही मी शिपोशीकरांचा आभारी आहे.

त्याच दिवशी कोकण मिडीयाचाही अंक माझ्या हाती आला.कोकण मिडियाचा आमच्यावर वरदहस्त आहेच पण या 9 व्या साहित्य संमेलनाला त्यांनी डोक्यावर घेऊन नाचवले आहे कारण गेली आठ वर्षे संघ जे पेरीत आला ते खऱ्या अर्थाने रूजले आहे याचा दाखलाच जणू शिपोशीकरानी दिला आहे हे कोकण मिडियाने ओळखून नेहमीपेक्षा जास्त पाने खर्च केली आहेत त्यामुळे कोकण मिडियाचेही आम्ही आभारी आहोत.
फार काय आता दुसर्या आठवड्यातील या संमेलनाची चर्चा थांबत नाही.9 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची चर्चा यापुढेही होत राहिल आणि त्याचे श्रेय हे शिपोशीकर व परिसरातील लोकांनाच असणार आहे.पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
सर्वांना !

अविस्मरणीय संमेलन. शिपोशीकरांचे मनःपूर्वक धन्यवाद.
ReplyDeleteखूप छान लिहिलय
ReplyDelete